जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२४
आजही ‘हिरो नंबर वन’ म्हणून त्याची लोकप्रिय असलेल्या अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.
गोविंदाबद्दलची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी त्याने बॉलिवूड गाजवलं होतं. . 2004 मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्याने राम नाइकविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोविंदाला विजय मिळाला होता.