जळगाव मिरर | २५ जुलै २०२३
जळगाव शहरातील अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे नुकताच शहरातील नवीन कानळदा रोड या ठिकाणी रिक्षा पलटी झाली असून रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सचिन जयस्वाल हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करतात. दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असतांना नवीन कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगराच्या पुढे जात असतांना अचानक दोन ते तीन कुत्रे मध्ये आल्याने त्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता. त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. घटनास्थळी ५ ते १० मिनिटे कुणालाही लक्षात आले नाही पण काहीना समजताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यानी त्यांना लागलीच रिक्षा उचलत बाहेर काढून त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने रिक्षात कुठलेही प्रवाशी नव्हते. रिक्षाचालक सचिन जैस्वाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सचिनला रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.
भटक्या कुत्र्यांचा वाहनधारकांना होतोय त्रास !
शहरातील नवीन कानळदा रोड परिसरातील विविध परिसरात भटक्या कुत्र्याचा त्रास नियमित होत असल्याने या परिसरात कुत्र्यामुळे अनेक अपघात होत असतात. रात्रीच्या सुमारास देखील या परिसरात लाईट नसल्याने अपघात होत आहेत. यावर मनपा प्रशासन कुत्र्याची विल्हेवाट लावणार आहे का असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारू लागले आहे.