जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडको मधील गवळी वाड्यात मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०) यांच्यावर रात्री आठच्या सुमारास चॉपर हल्ला होवून तो जागीच ठार झाला होता. या ठिकानाहून हल्लेखोर मात्र फरार होण्यात यशस्वी झालं होता. मात्र पोलीस यंत्रणेने त्या संशयितास फक्त दोन तासात अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हुडकोतील ४० वर्षीय मोहंमद मुसेफ शेख इसाक यावर चोपरने वार करून खून केला होता.मात्र पोलीस यंत्रणेने
घटना घडताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने संशयिताची गुप्त माहिती काढून पथकातील उपनिरीक्षक लहारे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील यांनी काळे नगर परिसरातून संशयित अझरुद्दीन शेख अलीमोद्दीन वय-३३, रा.अमन पार्क, शिवाजी नगर याला ताब्यात घेतले आहे.





















