जळगाव मिरर | १५ जुलै २०२४
पहाटेच्या सुमारास घरातील पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी गेलेल्या आनंदपाल बाविस्कर यांच्या घरात शिरुन २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शिवाजीनगर हुडको परिसरात घडली होती. चोरी करणाऱ्या कृष्णा पांडुरंग सोनवणे वय २८, रा. शिवाजी नगर हुडको याच्या शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील आनंदपाल बाविस्कर हे पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी घेवून गेले होते. यावेळी त्यांचा पुतण्या घरात झोपलेला असल्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. ही च संधी साधत चोरट्याने त्यांच्या घरात शिरुन २ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी कृष्णा सोनवणे याने केले असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत रविवार दि. १४ जुलै रोजी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ किशोर निंकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, सतिष पाटील, पो.ना. योगेश पाटील, अमोल ठाकूर आणि रतनहरी गिते यांच्या पथकाने केली.