
जळगाव मिरर । २९ डिसेंबर २०२२
शहरातील एका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने घरफोडी करीत ३५ हजाराचा एवस लंपास केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील निमखेडी शिवारातील अनुपम सोसायटी अष्टभुजा मंदिराच्या गेट जवळील रहिवाशी गणेश अशोक पाटील (वय ४५) यांच्या घरात दिनांक ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर यादरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातून ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व २२ हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ३५ हजाराचा मुदेमाल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोहेका अनिल मोरे हे करीत आहे





















