मेष : काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करून आज घरातील वातावरण सकारात्मक होईल. प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेजाऱ्यांशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. याचा तुमच्या कुटुंबाला त्रास होईल. इतरांच्या समस्येमध्ये हस्तक्षेप करु नका. कामाच्या ठिकाणी काही कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणाव आणि थकवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल.
वृषभ : आज तुम्ही तुमचे कार्य एकाग्रतेने आणि उर्जेने पूर्ण कराल. धार्मिक कार्यक्रमाचेही नियोजन कराल. कुटुंबासोबत मनोरंजनासाठी थोडा वेळ व्यतित करा. मुलांच्या करिअरबाबत थोडी चिंता असेल. नकारात्मक वातावरणात संयम राखणे फायदेशीर ठरेल. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे. पती-पत्नी सुसंवाद साधतील. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होईल.
मिथुन : तुमच्या महत्त्वाच्या योजना सुरु करण्यासाठी आजची वेळ योग्य आहे. ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या क्षमता आणि उर्जेचा पुरेपूर वापर करा. सामाजिक संस्थांना मदत करण्यातही काही वेळ जाईल. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष द्या. वाहन कर्ज घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या. घर आणि व्यवसायात सुसंवाद राखण्यात आनंदी वातावरण राहील. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.
कर्क : आज नवीन काम सुरू होऊ शकते. जवळचे पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या अभ्यासासाठी नियोजन फलदायी ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला प्रकृतीची काळजी राहील. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होवू शकतो.
सिंह : आज काही खास लोकांशी भेटीगाठी होतील. फायदेशीर विषयावर चर्चा होईल. मालमत्ता विक्रीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. मुलांची कोणतीही आशा पूर्ण न झाल्याने मन निराश होऊ शकते. काळजी करू नका, मुलांचे मनोबल वाढवा. कौटुंबिक वातावरण सामान्य ठेवा. आयात-निर्यात संबंधित व्यापाराला गती मिळू लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
कन्या : आज सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या कृतीबद्दल जागरूक रहा. सध्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही; पण आजची मेहनत भविष्यात योग्य फळ देऊ शकते. एखाद्यावर जास्त संशय घेणे हानिकारक ठरू शकते. वैयक्तिक कामामुळे व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : आज जनसंपर्काच्या सीमा वाढतील. कौटुंबिक कामे व्यवस्थित पार पडतील. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. आळस टाळा. अन्यथा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये सुसंवाद राखावा लागेल.
वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बौद्धिक क्षमतेच्या जोरावर यश मिळवाल. समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्येही तुमचा सन्मान वाढेल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी पुन्हा समोर येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा यामुळे नाते बिघडू शकते. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. व्यावसायिक कामे मंद होतील. जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल. विचारांमधील नकारात्मकतेमुळे थोडे उदासीनता किंवा ताण येऊ शकतो.
धनु : तुमचा सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. नातेसंबध अधिक दृढ होतील. मुलांच्या भविष्यासाठीच्या योजनांमध्ये तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. वारशाने मिळालेल्या मालमत्तेत व्यत्यय आल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीतील व्यापारातील परिस्थिती फायदेशीर ठरेल. पती-पत्नी सुसंवादातून समस्या सोडवू शकतात. पोटविकाराचा त्रास जाणवेल.
मकर : कौटुंबिक कामे व्यवस्थितपणे चालवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात आज एखादा महत्त्वाचा अधिकारी मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : आज भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक विचार करा. व्यावसायिक व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामात आज वेळ वाया घालवू नका. तणाव तुमच्या कार्यक्षमतेवर आणि मनोबलावर परिणाम करू शकतो.
मीन : तुम्ही तुमच्या कामात आत्मविश्वासाने समर्पित व्हाल. कुटुंबासोबत थोडा वेळ व्यतित करा. नातेवाईक आणि मित्रांशी चांगले संबंध ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.