जळगाव मिरर । ५ मे २०२३ ।
यंदा एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त कमी प्रमाणात असल्याने मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विवाह मुहूर्त आहे. त्यामुळे अनेक ग्राहक लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत येत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विवाह हा एक मोठा उत्सव असतो जो तो आपल्या परीने मोठ्या धूमधडाक्यात हा उत्सव साजरा व्हावा. यासाठी प्रयत्न करीत असतो, त्यामुळे लग्नात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष नवरदेव व नवरीकडे असल्यामुळे प्रत्येकाच्य लग्नात मेकअपपासून ते आपल्या कपड्यापर्यत सर्वच कसे ब्रेंडेड घेण्याकडे कल असतो. तुम्ही जर कुणाच्या लग्नात जाणार असाल किवा तुमच्या घरी जर लग्न असेल तर हि बातमी तुमच्या साठी महत्वाची असेल.
संपूर्ण भारत देशातील ५० हजारांहून अधिक दर्जेदार ब्रॅण्डेड वस्त्रांचा विलोभनीय असा भव्य डिस्प्ले ग्राहकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा व मनाला सुखावणारा आहे. फॅशन ट्रेंडसनुसार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशी-विदेशी आधुनिक कपड्यांचा सर्व पारंपारिक शैलीची अगदी २९९ रुपयांपासून ते लाखांपर्यंतची वस्त्रे या दालनात उपलब्ध आहेत. यामुळे फॅशन हब म्हणून जळगाव शहराची वाटचाल सुरू असल्याचे संकेत सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन मधून मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव हा व्यवसायिक आणि भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती असा जिल्हा आहे. तसेच बाजारपेठ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जळगाव नक्कीच फॅशन हब ठरेल, तसेच जळगावची नवी ओळख आता वस्त्रनगरी म्हणून निर्माण होतेय.
जळगाव शहरातील नवीन कानळदा रोड परिसरातील राधाकृष्ण नगरातील मुख्य रस्त्यावर ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’ या दालनाची भव्य सात मजली व सुसज्ज अशा वास्तूत रुपांतर होत असून देशातील वस्त्रांचा अद्वितीय डिस्प्ले एकाच छताखाली असणार आहे. राज्यात नव्हे तर देशातील सर्वात मोठे हजारो ब्रॅण्डेड वस्त्रांचे दालन म्हणून या वास्तूकडे पाहिले जात आहे. विश्वासार्हता, आपुलकी आणि उत्तम सेवाभाव या सर्वांच्या बळावर जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशातील ग्राहकांसाठी रेडिमेड तसेच कापड व्यवसायात नावलौकिक प्राप्त केलेले आणि ७३ वर्षांची परंपरा जोपासलेले ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’ची मुहूर्तमेढ १९४९ साली स्व. ग्यानचंद हासवानी यांनी रोवली. आता याच वास्तूचे स्थलांतर सुसज्ज अशा स्वरुपात होत आहे. नवीन दालन वातानुकुलित असून प्रशस्त पार्किंग व्यवस्थेसह पर्यावरणाचे रक्षण करीत वास्तूत सोलर विजेचाही वापर करण्यात आलेला आहे. ग्राहकांच्या सोयीनुसार नवीन दालनात एक हजार मॅनिक्वीन्स्द्वारे हजारो वस्त्रांचे अद्वितीय कलेक्शन डिस्प्ले स्वरुपात उपलब्ध आहे. ज्यामध्ये १५ हजाराहून अधिक डिझायनर साड्या, शालू, सिल्क साड्या, घागरा-ओढणी, सात हजाराहून अधिक एथनिक वेअर, ब्लेझर, सूट, शेरवानी, जोधपुरी, कुर्ता- पायजमा तसेच ३० हजाराहून अधिक मेन्सवेअर व पार्टीवेअर, जीन्स, ट्राऊझर्स, टी शर्टस, शर्टस् यासह देशातील सर्वोत्तम ब्रॅण्डस् व सुटिंग- शर्टिंगची विशाल श्रृंखला या दालनात पाहायला मिळणार आहे. परिवारासह मनपसंद खरेदीचा आनंद निश्चितच या ‘वस्त्रनगरी’त करता येईल. कस्टमाईज्ड जेन्टस् टेलरिंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दालनाची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत तर रविवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असणार आहे. ‘वस्त्रनगरी’त ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक मुकेश ग्यानचंद हासवानी यांनी केले आहे.