जळगाव मिरर / २४ जानेवारी २०२३
शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तार हिवाळी अधिवेशन संपल्यावरही झाला नसल्याने राज्यात राजकीय चर्चेला जोर आला आहे. तर विरोधक सातत्याने टीका करीत असल्याने आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत जात अमित शहा यांची भेट घेत बैठक झाली.
या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबतच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना सीएम एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज महत्वाची बैठक अमित शहांसोबत झाली. सहकार क्षेत्राशी संबंधीत बैठकीनंतर सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, इथेनाॅल आणि को जनरेशन यासह साखर उद्योग आणि त्यातील अडचणी व सशक्त उपाययोजना यावर चर्चा झाली. सहकारमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे तर साखर उद्योगावर चर्चा झाली.
दिल्लीत अमित शहांसोबत सुरू असलेल्या बैठकीत शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला किती मंत्रिपदे याचे गणित लावले जात असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंजळ विस्ताराचे त्रांगडे अमित शहा यांच्या सूचनेनुसार आणि अनुमतीने सोडवण्यावर उभय नेत्यांचा भर दिसतो. यावर सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच राज्यमंत्रिमंडळ विस्तार होईल. महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. राज्यपालांच्या या भूमिकेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातल बदलांची शक्यता असून याही एका महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथल शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. विशेषतः या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे याही उपस्थित हेत्या.