जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४
राज्यातील महायुती सरकारचा आज मंत्री मंडळ विस्तार असल्याने अनेक आमदारांची धाकधूक वाढली आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवारांची वर्णी लागली आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात कोणत्या आमदाराला कोणते खाते मिळते हे महत्वाचे राहणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातून किती आमदारांची मंत्री पदी वर्णी लागले हे देखील महत्वाचे असेल. तर जिल्ह्यातील तीन दिग्गज नेत्यांना मंत्री पदाची गळ्यात माळ पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेतून जळगाव ग्रामीण मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आ.गुलाबराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून मंत्री पदाचा कार्यभार हाती होते. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा तगडा अनुभव असल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
तर दुसरीकडे भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हटले तर जामनेर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आ.गिरीश महाजन अनेक वर्षापासून मंत्रीपद भूषवित आहे. त्यामुळे त्यांना देखील यंदाच्या मंत्रीमंडळात संधी आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून त्यांचे नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चर्चेत येत असल्याने त्यांना पक्ष हि देखील संधी देवू शकते. हे नाकारता येत नाही.
तर महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील जळगाव जिल्ह्यतील अमळनेर विधानसभा मतदार संघात एकमेक आमदार आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ.अनिल पाटील हे अजित पवारांनी आपली वात वेगळी केल्यापासून ते खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे.