जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२३
राज्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होत असतांना पुन्हा एकदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात खळबळजनक घटना यवतमाळ शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला त्याच्या रूमच्या आजूबाजूला राहणाऱ्या सात जणांनी जिवे मारण्याची धमकी देत सातत्याने अनैसर्गिक अत्याचार केले. यामुळे विद्यार्थी शॉकमध्ये गेल्याने त्याची प्रकृती खालावली. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
अभियांत्रिकी अंतिम वर्षाला असलेल्या चेतन लोंढे याने पीडित युवकाला रूमवर नेऊन इतर मित्रांच्या साथीने अत्याचार केला. जिवे मारण्याची धमकी देऊन सातत्याने हा प्रकार केला. यात आरोपी चेतन लोंढे, सुशय आठवले, तेजस आणि इतर ७ जणांचा समावेश आहे. शेवटची घटना २८ जुलै रोजी घडली. यावेळी पीडिताला शस्त्राचा धाक दाखवत धमकाविण्यात आले होते. यामुळे त्याची प्रकृती खालावली. अमरावती येथे राहणाऱ्याा पालकांना ही बाब माहीत होताच त्यांनी याची चौकशी सुरू केली. मुलावर उपचार केले.