
जळगाव : प्रतिनिधी
४ ऑगस्ट हा जडीबुटी दिन म्हणून साजरा केला जातो. या जडीबुटी दिनास शहरातील महिला पतंजली योग समितीतर्फे चेतना व्यसनमुक्ती केंद्र येथे आयुर्वेदिक रोप व ट्री गार्ड लावून वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, ४ ऑगस्ट हा जडीबुटी दिन म्हणून साजरा करण्यात येतो यादिनी शहरातील महिला पंतजली समितीमार्फेत चेतना व्यसनमुक्ती केंद्र मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयुर्वेदिक वृक्ष वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तर चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, जिल्हा प्रभारी मनिषा पाटील, मिडियाप्रभारी नेहा जगताप, वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांच्या शुभ हस्ते अडुळसा, बेहडा, चिंच, आवळा, जांभूळ, काशीद ,करंज ,गुलमोहर,पिंपळ, व इतर आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी योगसाधक रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, भाग्यश्री महाजन, नूतन तास खेडकर, संगीता चौधरी, प्रा वाय. एस .बोरसे, प्रतीक सोनार, सागर डेरे, आनंद विसपुते, महेंद्र सपकाळे, राजेंद्र सपकाळे, गणेश गायकवाड, हिम्मत शिरसाट, विजय ठोके, राजेंद्र सोनार व सर्व योगसाधक कर्मठ कार्यकर्ते उपस्थित होते




















