जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२५
निष्काम कर्मयोगी मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा पुण्यतिथी आज जळगाव जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, संत गाडगेबाबा बहुद्देशिय संस्था व सहयोगी समाज संस्था यांचे वतीने साजरी करण्यात आली.
संत गाडगेबाबा उद्यानात संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण आमदार श्री. राजुमामा भोळे, माजी उपनगराध्यक्ष श्री. वासुदेवभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी समाजातील विविध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य समाज बांधव यांची उपस्थिती होती परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.अखिल भारतीय धोबी महासंघाचे सदस्य श्री.दिलीपदादा शेवाळे यांचेतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उद्यानात अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या संत गाडगेबाबांच्या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली





















