जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
भादली बुा येथील सौ. मि. रा. महाजन प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात शिक्षिण विस्तार अधिकारी श्री. विजय पवार तसेच संस्थेचे संचालक श्री. सुनिलदादा अत्तरदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर परिषदेचे अध्यक्ष श्रीमती वैशाली बाविस्कर मॅडम होत्या सदर परिषदेत श्री विजय पवार साहेबांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत प्रभावी अंमलबजावणीसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावे व जिल्हा स्तरावर केंद्र भादली चा तिसरा क्रमांक असून प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देऊन इतर विषयांबाबत मार्गदर्शन केले.
पायाभूत चाचणी (PAT), शैक्षणिक गुणवत्ता व सद्यास्थिती, निपूण महाराष्ट्र, परख अहवाल, माझा वर्ग माझे नियोजन इत्यादी विषयांवर श्रीमती शुभांगी पाटील मॅडम, श्री सूरज भंगाळे, श्री.वासुदेव चित्ते श्रीमती सुनंदा सैंदाणे मॅडम यांनी मार्गदर्शन केले सदर परिषदेचे आयोजन व प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर मॅडम यांनी केले सदर परिषदेला महात्मा गांधी विद्यालय भादली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के डी रडे व परिसरातील भोलाणे, कडगाव, भादली, शेळगाव, कानसवाडे , देऊलवाडे,सुजदे येथील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपास्थित होते. परिषदेचे सूत्रसंचालन उपशिक्षिका निलिमा बाविस्कर मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री चेतन गाजरे यांनी मानले
