जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२३
चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर येथे चारीत्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केला. पत्नीच्या गुप्तांगात लाल मिरची पावडर टाकून क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर येथे संशयित आरोपी राजेश जगन पावरा (बारेला) हा पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशयत घेत असल्याने त्यातून कौटुंबिक वाद होते. 25 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 ते 26 पहाटे 6 वाजेच्या दरम्यान, तळोंदा दिगर शेत शिवारात पत्नीच्या गुप्तांगात घरातील लाल मिरची पावडर टाकून क्रूर पद्धतीने पत्नीची हत्या केली.
खूनप्रकरणी रामेश्वर रुपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी पती राजेशला अटक केली.