
जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
इतिहास म्हटले की सनावळ्या, लढाया, तह यातील घटनांची नोंद म्हणजे इतिहास. यात हिंदवी स्वराज्याचे मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श युवकयुवकांना प्रेरणादायी असून हिंदवी साम्राज्य, परकीय आक्रमक तसेच प्रसंगी स्वकियांच्याविरोधात सीमा रक्षणासाठी समाज एकत्र ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आयुष्य खर्च केले. त्यांच्या युद्ध नितीसंदर्भात अनेक दाखले देत तत्कालीन वाडा संस्कृती व आजचे संस्कृतीचा मागोवा घेत सिने अभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत व्याख्यान खुलविले.
विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यातर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्त चाळीसगाव येथे तेली मंगल कार्यालयात व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील, व्याख्याते डॉ.राहुल सोलापूरकर, डॉ.राहुल करंबळेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
संघाची विचारधारा पुढे नेत असताना शाखा विस्तार, विचारांची देवाण घेवाण, प्रबोधन आदी उपक्रम सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. यात महिला सबलीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार यातून उदरनिर्वाह साधने उपलब्ध करणे, तसेच आरोग्य शिबिरे, तीनशे महिलांना पोषण आहार पुरविणे आदी योजनांची विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे अंमलबजावणी केली जात असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी मनोगतातून सांगितले.
मातृशक्तीचा गौरव
कार्यक्रमादरम्यान, कल्पना कुलकर्णी, आरती पूर्णपात्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, डॉ.भाग्यश्री शिनकर, डॉ.शुभांगी पूर्णपात्रे, मेहूणबारे प्रा.आ.केद्राच्या वैद्यकीय अधिकारी वैदेही करंबळेकर, दिव्यांगत्वावर मात करीत अन्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मीनाक्षी निकम आदी कर्तृत्ववान महिला भगिनींना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गोळवलकर गुरुजी यांच्याकडून संघाचे बाळकडू
लहानपणी आमच्या वाड्यात मी एकटाच होतो, एकटाच खेळत असताना एक गृहस्थ आले. त्यांनी विचारले एकटाच काय खेळतो, आमच्याकडे येणार का? आणि ते त्यांच्या सोबत घेऊन गेले. आणि तेथूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्याकडून संघाचे बाळकडू मिळाले.
शिवरायांच्या युद्धकलेचा इतिहास ब्रिटिशांच्या अभ्यासक्रमात
आपल्याकडे इतिहासात सणावळ्या लढाया तह यामधील घटनांचा उल्लेख असतो. परंतु लंडनच्या मेट्रो स्टेशन दरम्यान एक म्युझियम आहे तेथे युद्धकला, युद्धनीती युद्धकालीन फोटो साहित्य संग्रह आहे. यात तेथील विद्यापीठ मध्ये शिकविले जाते.
शत्रुची मानसिकता ओळखून त्यावर विजय
आपल्याकडे इतिहासात सणावळ्या लढाया तह यामधील घटनांचा उल्लेख असतो. परंतु लंडनच्या मेट्रो स्टेशन दरम्यान एक म्युझियम आहे तेथे युद्धकला, युद्धनीती युद्धकालीन फोटो साहित्य संग्रह आहे. यात युद्धनीती शिकविली जाते. हे लेखक मिलन यांनी pratapgar a society war यात सांगितले आहे. शत्रुची मानसिकता ओळखून त्यावर छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने शाईस्तेखान, अफजलखानाने विजापूर ते प्रतापगड दरम्यानचा प्रवासात त्यांच्यावर कसा विजय मिळविला. हे कथारुपात व्याख्यानातून अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सादर केले.
कोकणात पोर्तुगिजांना जेरीस आणत गड किल्ले हस्तगत केले. हे आदिलशहाच्या बेगम साहिबा यांना सहन आदिलशाहीच्या सर्व सरदारांना हजार रहा असे फर्मान काढले. सरदार हजर झाले. यात शिवाजी राजांवर स्वारी करण्यासाठी कोण विडा उचलणारे असे विचारले. त्यावेळी अफजलखानाने विडा उचलत प्रतिज्ञा करीत पावणे दोन लाखांची फौज घेत मोहीम फते करण्यासाठी कूच केले.
गनिमी काव्याने सहा सात महिने झुंजवले
यावेळी शिवाजी महाराजांकडे मोजकेच ७० ते ७५ हजार सैनिक पण ते देखील विखुरलेले होते. अफजलखान चढाई करून येत आहे हे हेरांनी सांगितल्यानंतर महाराजांनी हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यांवर खानाचे सैन्य कमी करत प्रतापगडावर बोलवले.
दरम्यान, खानाने तुळजाभवानी, विठ्ठल आणि माणकेश्वर येथील देवतांची नासधूस केली. यानंतर मात्र छत्रपतीनी शांतपणे पण मुत्सद्दी धोरण आखत दोघांकडून वकिलांच्या बोलणी ठरल्यानुसार भेट ठरली, तेथे देखील शस्त्र असेल तरी ते म्यान असावे अशी अट घालून अंदाज घेत अफजलखानाने बेसावध असल्याचा आव आणत शिवाजी राजांना आलिंगन देत बगलेत मान दाबून पाठीवर तसेच डोक्यावर वार केला. तरीदेखील राजांनी चपळाईने हालचाल करीत अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. यात जखमी झालेल्या खानाला पालखीतून नेणाऱ्या सेवकांना जायबंदी करीत गडाखाली नेताना धडा शिकवला.
महाराजांच्या युद्ध नितीनुसार प्रत्येक युद्ध वेगळे आहे
मोगलांची १,७५ हजार सैनिकांची फौज, यात शिवरायांच्या अवघ्या ४०८ सैनिकापैकी फक्त २०० सैनिकांनी हेरगिरी करीत शिवरायांनी गनिमी काव्याने शाइस्तेखानाच्या कुटुंब कबिल्यातील व्यक्तींचा निःपात करीत शाइस्तेखानावर विजय मिळविला.याचे ऐतिहासिक घटनेचे शब्दवर्णन ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होउन गेले होते