जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२५
अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आता दिवाळीच्या सुट्यांपूर्वी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती असणार आहे.
‘दिवाळी मेळा 2025’ कार्यक्रम रविवार, 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:00 ते 7:00 वाजेपर्यंत आयोजित केला जाईल. मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी स्वतः तयार केलेले खाद्य पदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने दिवाळी मेळात आणणार आहे. विद्यार्थी ही खाद्य पदार्थ आणि उत्पादने व्यवस्थापन आणि पालकांच्या मदतीने करणार आहे.
मुलांना काय होणार फायदा?
मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले आहे. यामुळे मुलांना योजना बनवणे, पॅकेजिंग करणे, विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यावहारिक गोष्टी शिकता येणार आहेत. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतःचा ब्रँड नाव आणि लोगो असणार आहे. जे मुलांनीच तयार केलेले असणार आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला विकसित होण्यास मदत मिळणार आहे. हा कार्यक्रम मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणार आहे




















