
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
विसाव्या शतकातील आधुनिक संत जात पात धर्म याच्याही पलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म हा विचार पुढे नेऊन जन मानसाच्या कल्याणासाठी व सेवेसाठी आपले संपुर्ण आयुष्य झिजवले आपल्या साध्या व-हाडी भाषेतुन किर्तनाच्या माध्यमातुन जगाला मानवतेचा संदेश देणारे, स्वच्छतेचे जनक परीट-धोबी समाजाचे आराध्य दैवत सामान्यातील अती सामान्य व गोर गरीब, अंध, अपंग, निराधार, रुग्णांसाठी व जन माणसासाठी कार्य करणा-या आशा महान व समाज सुधारक श्री संत गाडगे बाबांच्या संत गाडगेबाबा उद्यान व गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पुजन व माल्यार्पण गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अश्या गजरात करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.वैशाली शरद शेवाळे, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा प्रणित गाडगेबाबा प्रबोधन परिषद तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजय शिरसाठ, सौ मनीषा संजय शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष गाडगेबाबाविचार प्रबोधन परिषद अमळनेर नपाचे माजीनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, तालुका अध्यक्ष गंगाराम वाल्हे, रवींद्र जाधव, माजी नगरसेवक परशुराम महाले, काशिनाथ खैरनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तर सूत्रसंचालन दीपक वाल्हे आभार मंडळाचे सचिव विजय वाघ सर यांनी केले अनिल जाधव गणेश नेरकर मधुकर निंबाळकर अनिल मांडोळे मनोज चित्ते भरत जाधव सुभाष आगलावे आदीं समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















