चाळीसगाव : कल्पेश महाले
रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र वालझिरी परिसरात नव्हे तर देशात सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात.
या भाविकांना अधिकाधिक सुख सुविधा मिळाव्यात यासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन निधीतून एक कोटी रुपये विकासासाठी उपलब्ध करून दिले आहे. भाविकांच्या विविध सोयीसुविधासह या परिसराचा कायापालट होणार असून या ऋषीभूमीची पर्यटन भूमीकडे वाटचाल अशीच सुरु राहवी यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज श्री क्षेत्र वालझिरी येथे 1 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामाचा भूमिपूजन सोहळा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.त्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.