जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा – बोरखेडा – वाघळूद – अनोरा रस्ता हा पूर्वी जिल्हा परिषदेकडे ग्रामीण मार्ग या दर्जाचा होता. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 7 मार्च 2019 ला सदर रस्त्याची दर्जोन्नती करून सदर रस्ता आता प्रजिमा 100 झालेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नेहमीच रस्ते व पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. 2 कोटी निधीतून सुरु असलेल्या बोरखेडा येथील पुलाच्या कामांची पाहणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. मंजूर असलेली पूल व रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
असा आहे पूल
तालुक्यातील मुसळी फाटा – बोरखेडा – वाघळूद – अनोरा रस्ता हा पूर्वी जिल्हा परिषदेकडे ग्रामीण मार्ग या दर्जाचा होता. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 7 मार्च 2019 ला सदर रस्त्याची दर्जोन्नती करून सदर रस्ता आता प्रजिमा 100 झालेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नेहमीच रस्ते व पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील मुसळी फाटा -बोरखेडा – वाघळूद – अनोरा रस्ता प्रजिमा 100 मध्ये बोरखेडा गावाजवळ पोहोच रस्त्यासह पुलाचे बांधकाम सुरु असून यासाठी नाबार्ड योजनेतर्गत 2 कोटी निधी मंजूर आहे. सदर पूल हा 30 मीटर लांबीचा असून यात 6 मीटरचे 5 गाळे आहे तर दोन्ही बाजूला 100 मी. पोहोच रस्त्यांची डांबरीकरण होणार आहे.
बोरखेडा पुलामुळे मुसळी, बोरखेडा, वाघळूद व अनोरा या गावाना दिलासा मिळणार असून धरणगाव तालुका दौऱ्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सदर पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नागरिकांची गैरसोय होता कामा नये. त्यामुळे रस्ते व पुलांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
