युवा उद्योजक अल्पेश देवरे यांच्याकडून संविधानाच्या पाच प्रती सप्रेम भेट
जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राथमिक विभागातर्फे संविधान जागर रॅली काढण्यात आली. विद्यार्थी संविधानाचे घोषवाक्य देत जनजागृती करत परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी या विषयावर थरारक पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी युवा उद्योजक अल्पेश देवरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधान ज्ञान दृढ व्हावे या उद्देशाने संविधानाच्या ५ प्रती विद्यालयास सप्रेम भेट दिल्या. त्यांच्या या कार्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार उपशिक्षिका रूपाली आव्हाड आभार प्रदर्शन शितल कोळी यांनी केले मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी युवा उद्योजक अल्पेश देवरे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले. व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















