जळगाव मिरर | १२ जून २०२३
जळगाव जिल्ह्यात अधिकृत संस्थेचे शाळांना दर वर्षी शासनाकडून अनुदान मिळते अशा शाळांना अनुदान मिळत असूनही डोनेशन च्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे देशात विद्यार्थी शिक्षण घेऊन ह्या देशाचे भविष्य उज्वल करणार आहेत मात्र डोनेशन च्या नावाखाली विद्यार्थी पालकांचे अक्षरशः लूट होत आहे विद्यार्थी पालकांचे मागील तीन ते चार वर्षांत जागतिक महामारी मुळे अर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्यात वाढती महागाई दरडोई वाढत आहे यामुळे ज्या पालकांचा हातावर पोट आहे अश्या असंघटित व मजूर कामगारांचे मुल मुली चांगले व गुणवत्ता पूरक शिकणं घेण्यापासून वंचित राहत आहे.

तसेच शाळांनी शालेय साहित्य बाबद जसे की वह्या, पुस्तक, कपडे, बुट इ.एखादा विशिष्ट दुकानातून खरेदी करावे आणि नाही केल्यास वर्गात बसू दीले जात नाही असे सक्ती विद्यार्थी व पालकांवर केली जाते शाळांनी ही केलेली सक्ती विरोधात आणि विविध मागण्या साठी आज मा. शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये होत असलेली पालकांची लूट नाही थांबली तर बहुजन मुक्ती पार्टी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन मा.विजय सुरवाडे जिल्हा कार्याधक्ष्य बहुजन मुक्ती पार्टी व इरफान शेख महानगराध्यक्ष यांनी केले. यावेळी उपस्थिती भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, तालुकाध्यक्ष सुकलाल पेंढारकर , सचिव खुशाल सोनवणे, शेर खान, राहुल सोनवणे, सुनील डेहदे, प्रकाश सोनावणे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




















