
जळगाव मिरर | ५ जुलै २०२४
शेतात फवारणीसाठी गेलेला तरूण विहिरीत पाय घसरूण पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे घडली. दरम्यान, चार बहिणींचा एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाल्याने या कूटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ब्राम्हणशेवगे शिवारात वाडीलाल राजेंद्र राठोड (वय २९) हा तरूण ३ जुलै रोजी शेतात मका पिकावर औषध फवारणी करायला गेला होता. अचानक पाय घसरूण शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून वाडीलाल राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाडीलाल राठोड याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.





















