पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील कराडी येथे शेतमजूर सालदारचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील बैताकवाडी येथील रुख्माबाई कमल चव्हाण (वय ३२, ता. पानसमेल, जि. बडवानी) यांनी या संदर्भात पारोळा पोलिसांत फिर्याद दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, कमल चव्हाण हे दोन वर्षांपासून तालुक्यातील कराडी येथे बबलू पाटील यांच्या शेतात सालदारकीचे काम करत हाेते. बबलू पाटील यांनी या कमल चव्हाण यांना घर बांधून दिले असून ते परिवारासह तेथे राहत होते. १७ मे रोजी शेतात मिरची लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रुख्माबाई घरी पाणी पिण्यास आली असता बबलू पाटील यांच्या शेताच्या शेजारी शेतकरी मुकुंदा पाटील यांच्यासह अन्य तीन जण एकमेकांना शिवीगाळ करत होते. या वेळी कमल चव्हाण यांनी ‘माझा परिवार राहत असल्याने शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करुन खाटेवर बसलेल्या कमल चव्हाण यांना पोटात लाथ मारली. पुढे पुन्हा एकदा मारहाण केल्याने उपचार सुरु असताना त्यांचा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तर ८ जूनला रात्री कमल चव्हाण यांचा उपचारादरम्यान नंदुरबार येथे मृत्यू झाला. या प्रकरणी पाराेळा पाेलिसांत मुकुंदा पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला अाहे.