
जळगाव मिरर | १० जून २०२३

जळगाव शहरातील एका व्यावसायिकाला त्याच्याच भावाचे अश्लिल फोटो बदनामी करण्याच्या उद्देशाने पाठविल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१ जून गुरुवार रोजी व्यावसायिक हा व्हॉट्स अॅप बघत असताना त्यांना एका क्रमांकावरून काही फोटो आले. ते फोटो डाउनलोड केल्यानंतर ते त्यांच्या भावाचे होते तर अश्लिल बनवून पाठवून आले होते. ते फोटो त्यांनी लागलीच डिलीट केले. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या मुलाच्या व्हॉटस्अॅपवर देखील तेच फोटो आले. बदनामी करण्याच्या उद्देशाने फोटो पाठविले म्हणून व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून एकाविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.




















