अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तापी, पूर्णा नद्यांच्या पुरामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा आणि एका कंपनीच्या रासायनिक खतामुळे झालेली नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा किसान कॉंग्रेसने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. १७ व १८ सप्टेंबरला तापी व पूर्णा नद्यांना पूर आल्याने अमळनेर तालुक्यातील तापी नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांची कापूस, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सुपर दाणेदार खतामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न गेले होते.त्यामुळे पुराच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी तर खतामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला खत कंपनीकडून मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, डॉ.अनिल शिंदे यांनी या निवेदनाद्वारे केली