• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० एप्रिल २०२६ 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात एका १० वर्षीय मुलाच्या अचानक बेपत्ता झाल्याने काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत मुलाचा शोध लागल्याने कुटुंबीयांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ईकबाल शहा हसन शहा (वय ३०) यांचा मुलगा दुपारी १२ ते १.३० वाजेच्या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ उलटूनही मुलगा परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली.

रात्री सुमारे ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत विशेष पथकाची नियुक्ती केली. भुसावळ परिसरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करत शोधकार्य अधिक तीव्र करण्यात आले.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुलाचा ठाव भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात लागला. पोलिस पथकाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेत मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या १ ते २ तासांच्या आतच मुलाचा शोध लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सुकराम सावकारे, फिरोज पठाण, सुनील जाधव आणि प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मुलगा सुरक्षित परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, अपहरणाच्या भीतीतून ते पूर्णपणे सावरले आहेत. नागरिकांनीही वरणगाव पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक केले आहे.

Related Posts

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group