पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा – भडगाव तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू असुन राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान होवुन एक महिना झाला असून या एकाच महिन्यात पाचोरा मतदार संघात विविध विकास कामांना मंजुरी मिळाली. ५५ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून लवकर या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दि. १९ आॅगस्ट रोजी त्यांचे “शिवालय” या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहरप्रमुख किशोर बारावकर, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, शिवदास पाटील, प्रविण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यातील शेवाळे ते सातगाव (डोंगरी) रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, नगरदेवळा स्टेशन ते नगरदेवळा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, निंभोरी तांडा फाटा ते शेवाळे रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, पाचोरा – वरखेडी – पहुर रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, पाचोरा ते खडकदेवळा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, पाचोरा ते कारखाना रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – २ कोटी ५० लाख रुपये, खडकदेवळा ते डोंगरगाव रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, वडगाव मुलाने ते दिघी फाटा रस्ता सुधारणा करणे – १ कोटी रुपये, शेवाळे – वाडी – शिंदाड रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ५० लाख रुपये, म्हसावद – दहिगाव – माहेजी – हनुमंतखेडा रस्ता माहेजी गावाजवळ गिरणा नदीवर मोठ्या पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे – २० कोटी रुपये, भडगाव तालुक्यातील अमळनेर – पारोळा – भडगाव रस्ता (भडगाव गावातील रस्ता रुंदीकरण) – २ कोटी ५० लाख रुपये, पारोळा – तरवाडे – कजगाव रस्ता (तालुका हद्द ते सिंधी फाटा ते सबस्टेशन) रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लाख रुपये, अमळनेर – पारोळा – भडगाव येथे पुलाचे बांधकाम करणे (भडगाव वलवाडीच्या मधील पुल) – २ कोटी ५० लाख रुपये, पारोळा – तरवाडे – कजगाव रस्ता रुंदीकरणसह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (सब स्टेशन ते कोळगावच्या पुढील पेट्रोल पंप) – २ कोटी ५० लाख रुपये तसेच पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील आठवडे बाजार परिसर विकसित करणे व छोट्या व्यावसायिकांकरिता टपरी शाॅप्स बांधकाम करणे – ५ कोठुन रुपये अशा ५५ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून लवकर या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.