जळगाव मिरर | ११ मार्च २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे व आ.धस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धनंजय मुंडे यांचे बंधू मैदानात उतरले असून त्यांनी आ.धस यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले आहे.
अजय मुंडे म्हणाले कि, भाजप आमदार सुरेश धस यांनी आमच्या धनंजय मुंडेंच्या आईबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. मुंडे कुटुंबीयांमध्ये आम्ही कोणीही धनंजय मुंडे यांच्या नाराज नाहीत. आमच्यामध्ये कुठलाही कौटुंबिक कलह नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत, असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी सुरेश धसांना दिले. तसेच आम्ही सर्व कुटुंबीय भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत, असेही अजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना धनंजय मुंडेंच्या कुटुंबाबाबत मोठा दावा केला होता. धनंजय मुंडेंच्या आई त्यांना सोडून गावी राहायला गेल्याचे सुरेश धस म्हणाले होते. तसेच धनंजय मुंडेंचे चुलतभाऊ त्यांच्यावर नाराज असल्याचेही सुरेश धस म्हणाले. त्यांच्या या आरोपांवर धनंजय मुंडे यांचे चुलतबंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
दोन-तीन दिवसांपूर्वी सुरेश धस यांची मुलाखत आली. त्या मुलाखतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या मातोश्री बद्दल जे सुरेश धस यांनी सांगितले की, त्या परळीचे घर सोडून नात्र्याच्या घरी राहायल्या गेल्या, त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत, अशाप्रकारचा आरोप केला आहे. शिवाय धनंजय मुंडे यांचे चुलतभाऊ हे त्यांच्यावर नाराज आहेत, असा दुसरा आरोप केला. कौटुंबिक कलह असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
आमच्या बाई परळीला राहत होत्या, हे खरे आहे. मध्यंतरी पंढरी निवासस्थानाचे रिनोव्हेशनचे काम सुरू आहे. परळीतील घराचे काम सुरू असल्यामुळे धनंजय मुंडेंच्या आईनी गावाकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडे देखील परळीला आल्यानंतर ते गावाकडे आईसोबतच राहतात. त्यामुळे सुरेश धस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत, असे धनंजय मुंडे यांचे चुलतबंधू अजय मुंडे म्हणालेत.
आज दोघे बहीण-भाऊ मंत्री झाले असताना, विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कुठलेही आरोप नाहीत. कुठलाही विषय नसताना त्यांना आज बदनाम केले जात आहे. त्यांना राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांची तब्येत खराब आहे. अनेक आजारांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सर्व मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत. धनंजय मुंडे यांच्यावर कुटुंबातील कोणीही नाराज नाही, असे अजय मुंडे यांनी स्पष्ट केले. परळी येथील घराचे रिनोव्हेशनचे काम सुरू आहे. असा कुठला गुन्हा आहे का? की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये. गावाकडचे घर म्हणजे आमचे मूळच तिथे आहे. आमचा जन्म तिथे झाला. स्वर्गीय अण्णा ज्या घरामध्ये वाढलेले आहेत. त्याठिकाणी आमच्या बाई जाऊन राहिल्या, तर त्यात वेगळे काय आहे? त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील तिथेच असतात. तेही परळीत नसतात. फक्त कामकाजासाठी, लोकांच्या भेटीगाठीसाठी ते परळीत येतात. मुक्कामाला ते गावाकडेच असतात.