जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५
गेल्या २५ वर्षापासून समाज चळवळीत काम करताना अनेक नेते पाहिले प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने कार्य केले यात शंका नाही परंतु खऱ्या अर्थाने समाजकार्याची सर्वांगीण कास घाती घेत शेवटपर्यंत धरून ठेवत प्रामाणिकपणे पार पाडणारे नेतृत्व म्हणजे मा. डी.डी. सोनटक्के साहेब व त्यांचा परिवार होय त्याचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे.मी सोनटक्के साहेबान सोबत गेल्या १५ वर्षापासून समाजकार्य करताना मी त्यांना जवळून पाहिले असताना एक गोष्ट आत्मसात अशी केली की एकीकडे भरगच्च संपत्ती, राजकीय वैभव, संस्थाधीश, पत्नी, सूना, शिक्षिका, मुले महत्वपूर्ण जवाबदारीवर तर दुसरीकडे आरक्षणाची तिळमात्र गरज नसताना सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपपर्यंत माझा धोबी समाज व त्या समाजाचा आरक्षणात्मक, शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास ही विचारधारा केंद्रस्थानी ठेवत एक रुपयाची वर्गणी न घेता स्वतःचा लाखोचा घरचं करत झपाटल्यासारखे समाजकार्य करणारे मा. सोनटक्के साहेब हेच होत.
मग कार्यकर्तेच्या दुःखद घटना असो की कोटुंबिक सोहळा असो की समाज संघटनात्मक बैठकीत तसेच कार्यक्रम असो यासाठी सदैव उपलब्ध होण्यासाठी साहेब सकाळी ५ किंवा ६ घरून निघो मग साहेबान सोबत कितीही समाजबांधव असो त्यांना नास्ता बनवून देण्याची अत्यंत प्रामाणिक जवाबदारी पार पाडणारी आमची माय सौ. रत्नमालाताई सोनटक्के यांचे पणं महत्वपूर्ण योगदान या समाजकार्यात आहेतच त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली सारख्या जिल्ह्यात Cast Validity काढताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या प्रयत्न, आपला राजकीय हित संबंधाचा वापर करत वीजबिलात ४९% सवलत प्राप्त करून देण्याची यशस्वी प्रयत्न, २१० गॅसवरील प्रेस, सिलेंडर, समाजबांधवांना ना. नितीनजी गडकरी यांच्या मार्फत मोफत उपलब्ध करून देणे, समजावरील होणाऱ्या अत्याचारबाबत सदैव आक्रमक भूमिका घेत न्याय मिळवून देण्याचा काम असो त्याचप्रमाणे मंत्रालयात २००२ ते २०१७ पर्यंत धूळखात बसलेली आरक्षणाची फाईल या संदर्भात आपल्या राजकीय स्व:हिताचा वापर करत ना. चंद्रशेखर बावनकुळे (तत्कालीन ऊर्जामंत्री) साहेबाच्या मार्फत धोबी समाजाच्या इतिहासात प्रथमच आरक्षणाची बैठक Minites मध्ये लावणारे मा. डी.डी. सोनटक्के साहेबानी खरी धुरा सांभाळत आरक्षणाची फाईलबाबत स्व:खर्चाने पाठपुरावा करत मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी, सचिव, प्रधान सचिव, मुख्यमंत्री प्रत्येक टेबलवर पाठपुरावा करत अनेक संकटाना तोंड देत आरक्षणाची फाईल प्रथमच दिल्ली सरकार दरबारी पाठविली व दिल्ली सरकार दरबारी पाठवली व दिल्ली सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाला आरक्षण संदर्भात जी माहिती वेळोवेळी लागत गेली त्या प्रत्येकवेळी संबंधित आयोगाचे सकारात्मक अहवाल, पत्र, असो की राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालायचा अहवाल असो, बार्टी या संस्थेचा अहवाल असो.
मा. सोनटक्के साहेबांनी प्राप्त करत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालायातून आरक्षणाची फाईल अंतिम टप्प्यात म्हणजे RGI कडे पोहचवली म्हणजे मा. डी. डी. सोनटक्के साहेबांनी आरक्षणाची ही चळवळ अंतिम टप्प्यात आणली मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिली म्हणूनच माझे ठाम मत असे आहे की आरक्षण मिळाले तर त्यात केवळ आणि केवळ मा. डी.डी. सोनटक्के साहेबांचा सिंहाचा वाट असेल व त्यापुढे जाऊन हे स्पष्ट करतो की जर राज्यात आरक्षण मिळणार तर ते मा. डी. डी. सोनटक्के साहेबानमुळेच नाही तर ते शक्यच नाही हे त्यांच्या सोबत काम करणारे अनेक पदाधिकारी साक्षी आहेत म्हणूनच मा. डी.डी. सोनटक्के साहेबासारख्या समाजासाठी निस्वार्थी व निर्भिडपणे लढणाऱ्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरक्षण संदर्भात आणखी हात मजबूत करण्याचे मी संतोष वाघ आपणास आव्हान करतो