जळगाव मिरर | २५ जुलै २०२५
महाराष्ट्र, गवळी समाज संघटना (र.नं.५४९) जळगांव जिल्ह्याच्या कार्यकारीणीची निवड उत्साहात संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष पदी दिलीप लक्ष्मण गवळी यांची निवड एकताने झाली.
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जालना येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्थरीय मेळाव्यामध्ये केद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री (भारत सरकार) आणि गवळी समाजाचे राष्ट्रीय समन्वक मा.ना.श्री.हंसराज अहिर यांनी जिल्हा अध्यक्षपदाचे निवड प्रमाणपत्र देवून दिलीप गवळी यांना सन्मानीत केले त्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.श्री.हिरामण आप्पा गवळी, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.वसंतनाना नामागवळी (मनमाड) व युवा प्रदेश अध्यक्ष श्री.प्रविण हुंडीवाले व वरिष्ठ मार्गदर्शक प्रा.श्री.भालचंद्र हुच्चे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दिलीप गवळी यांनी नोकरी सांभाळत खेळ,होमगार्ड व अनेक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याने दिलीप गवळी यांना मा.राष्ट्रपती, भारत सरकार यांनी राष्ट्रपती पदकाने तर महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व गुणवंत जिल्हा क्रिडा संघटक पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच विविध शासकिय व सामाजिक क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी सन्मानित श्री.दिलीप गवळी यांनी म.ग.समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या ३०-३५ वर्षा पासुन करीत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना समाजाने सुध्दा “समाज भुषण” पुरस्कार देवून सन्मानित केलेले आहे. रायफल शुटिंग या खेळात त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील २२ पदके पटकाविलेले असून रायफल असोशिएशन च्या माध्यमातून २ आंतराष्ट्रीय व ६०० वर राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडविलेले आहे.
शालेय जिवनात N.C.C. मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेश येथील कुलू मनाली येथे रॉक क्लॅमिंग तसेच २६ जानेवारी १९७८ रोजी दिल्ली येथे झालेल्या २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सुध्दा त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आणि १९८१ मध्ये आग्रा येथे झालेले पॅराशूट ट्रेनिंग त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करुन पॅकेट या लष्करी विमानातुन पॅराशुटच्या सहाय्याने जम्पस मारुन इंडियन पॅराटूपर हा किताब पटकाविलेला आहे. दिलीप गवळी यांची पुन्हा तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्या बद्दल समाजात सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.




















