जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२३
राज्यातील प्रत्येकाच्या घरोघरी पोहचलेली मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ या मालिकेत अनेक नव्या कलाकारांनी काम केले आहे. त्यातील एक कलाकाराची मोठी चर्चा आज देखील होत असते. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यातील डिंपलची भूमिका अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने साकारली होती. आजही तिचे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहे. डिंपलची भूमिका साकारल्यानंतर अस्मिता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सन मराठीवरील एका नव्या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अस्मिताच्या या नव्या मालिकेचे नाव ‘तुझी माझी जमली जोडी’ असे आहे. यात ती अभिनेता संचित चौधरीसोबत दिसणार आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या प्रोमोत दिसते की, ती घरच्या पूजेसाठी सामान घेऊन येते. मात्र केळीचे खांब आणायचे ती विसरते. शेजारी असलेल्या संचितचे केळीचे खांब घेऊन ती घरी जाते आणि तिच्या पाठोपाठ तोही घरी पोहोचतो. त्यावर ती त्याची आपला मित्र म्हणून ओळख करून देते. तिचा हा श्रीमंत मित्र पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. आता या दोघांची लव्हस्टोरी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.