जळगाव मिरर । १९ नोव्हेंबर २०२५
रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचे हातपाय दोरीने बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी फौजफाट्यासह धाव घेतली. मयत मुलाचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय ३२) असे असून खून करणाऱ्या आरोपी पिता रवींद्र भगवान पाटील याला अटक करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कुसुंबा खुर्द येथील रवींद्र पाटील व सचिन पाटील या बापलेकांमध्ये सातत्याने संपत्तीच्या कारणावरून नेहमी वाद होत होते. काल सोमवारी रात्री सचिनने पुन्हा दारू पिऊन वडील रवींद्र पाटील याच्याशी वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या बापाने मुलाचे पोराने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारल्याने त्यात तो जागीच ठार झाला. मुलाचा खुनाची माहिती सकाळी मुलाच्याच पाटील रईस तडवी यांना दिल्याने घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात आली.
घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी, योगेश पाटील सुकेश तडवी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने भेट देवून पाहणी केली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात रवींद्र भगवान पाटील याच्याविरुद्ध असून खून आरोपी पित्यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल करीत आहे.





















