
जळगाव : प्रतिनिधी
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या “हर घर तिरंगा” या उपक्रमात शहरातील सामाजिक संघटनाही सहभागी होत आहे. तसेच आर. के. ग्रुपच्यावतीने तालुका पोलीस स्थानकात राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
भारत देशाच्या ७५ वा आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा निमित्त जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पीएसआय गणेश सायकर, अशोक महाले यांच्यासह पोलीस स्थानकात असलेले पोलीस बांधवाना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी राज कोळी, दिपक कोळी, धर्मराज निकम उपस्थित होते.




















