
जळगाव मिरर | २३ जून २०२४
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता राज्यात शिक्षक निवडणूक सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि.२२ रोजी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी जळगावात आले होते. हि प्रचार सभा शहरातील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली.
आधीच सभेला उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर शिक्षक लोकांनी बाहेर जेवणाकडे जाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री गेल्यानंतर या सभागृहात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले, असा आरोप करत याबाबतचा व्हिडिओ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जूनला होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. ही सभा सायंकाळी सहा वाजता आदित्य लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग? @MahavikasAghad3 @ECISVEEP pic.twitter.com/QHT3j0jJIK— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 22, 2024
मात्र तब्बल मुख्यमंत्री हे दोन तास उशिरा आले असल्याने या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड झाला. नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याने काही कर्मचारी या ठिकाणाहून बाहेर पडले, मात्र सभा आटोपल्यानंतर परत सभेच्या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांना पैसे वाटण्यात करण्यात आले ,असा आरोप करत सुषमा आंधारे यांनी ट्विटरद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कुठे आहे निवडणूक आयोग असा सवालही त्यांनी यावेळी ट्विटरद्वारे उपस्थित केला.





















