
जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा शारिरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरिक शिक्षण शिक्षक महामंडळ आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव, क्रीडा संचालक, क्रीडा मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा एकलव्य क्रीडा संकुल सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, बालविश्व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भारती चौधरी, माजी महापौर भारती सोनवणे, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, शिवछत्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक नगरसेवक सिद्धेश्वर वाघुळदे, राज्य शिक्षक पुरस्कार्थी अश्विनी कोळी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी, सूत्रसंचलन महिला क्रीडा शिक्षक महासंघाच्या सचिव डॉ.कांचन विसपुते तर आभार प्रदर्शन विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रा. माधवराव यशवंतराव चव्हाण (चाळीसगाव) जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा संचालक पुरस्कार
प्रा.सतिष माधवलाल कोगटा (ॲड. सिताराम आनंदराम बाहेती महाविद्यालय, जळगाव) व डॉ.विजय काशिनाथ पाटील (पंकज महाविद्यालय, चोपडा) जिल्हा स्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार प्रशांत पितांबर पाटील (सर्वोदय माध्यमिक विद्यालय कुंझर, चाळीसगाव.) अरुण सुरेश ठाकरे (नूतन मराठा विद्यालय, जळगाव) जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार नरेंद्र नामदेव महाजन (प्रताप विद्या मंदिर, चोपडा) धिरज किरण जावळे (सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविश्व विद्यालय, जळगाव) व विशाल प्रल्हाद सोनवणे (भाऊसाहेब राऊत विद्यालय, जळगाव) जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार स्वप्निल यशवंत पाटील (शांती निकेतन विद्या मंदिर, अमळनेर)शेख आरीफ शेख बाबुलाल (डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ) अरुणसिंग कल्याणसिंग राजपूत (बबनबाई जवरीलाल हिरण माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कजगाव, भडगाव) श्री.जगदीश भटू जाधव (विद्या भारती माध्यमिक विद्यालय विरवाडे, चोपडा) श्री.दिनकर नाना पाटील (इंदिरा गांधी माध्य. व उच्च माध्य.विद्यालय, धरणगाव) श्री.अमोल प्रतापसिंग पाटील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्य. विद्यालय (चाळीसगाव) श्री.युसुबखान महम्मद ह्यातखान (अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज,एरंडोल) श्री.दिनेश दामू सोनिस (बोहरा सेंट्रल स्कूल,पारोळा) समीर विष्णू घोडेस्वार (इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय, जामनेर) संदीप शामराव कांडेलकर (मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे, मुक्ताईनगर) योगेश गोवर्धन कोळी (प्रभात विद्यालय हिंगोणे, यावल) श्रीकांत नामदेव महाजन (सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, ऐनपूर, रावेर) क्षितीज संजीवकुमार सोनवणे (सि.रा.चौधरी हायस्कूल, किनोद, जळगाव) सुभाष रामदास राठोड (माध्यमिक विद्यालय, घुसर्डी, पाचोरा) जितेंद्र शांतीलाल ओस्तवाल (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव) सरस्वती प्रकाश पाटील (श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव) विजया प्रमोद चौधरी (सिताबाई गणपत भंगाळे माध्य. विद्यालय, जळगाव) चारुशिला नंदू पाटील (सेंट लॉरेन्स हायस्कूल, जळगाव) सुप्रिया पांडूरंग पाटील (शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, वाघझिरा, यावल) संजीव पंडित चौधरी (धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, रावेर) यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रणजीत पाटील, प्रा.हरीश शेळके,कांचन नारखेडे, समिधा सोवनी, रिना पाटील, योगेश सोनवणे, सचिन महाजन, निलेश पाटील, राहुल साळुंखे, सचिन सूर्यवंशी, सुनिल वाघ,अनिल चव्हाण, संदीप पवार, देविदास महाजन, जितेंद्र शिंदे, जितेंद्र फिरके, अजय काशीद यांचे अनमोल सहकार्य लाभले.





















