
अमळनेर: विक्की उत्तम जाधव
वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बालाजी कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यानी दिनांक २५ ऑगस्ट रोजी पीएच.डी पदवी देऊन सन्मानित केले.
प्रा बालाजी कांबळे यांनी ‘A study of the impact of Pradhan Mantri Fasal Bima Yojna in Development of Agriculture Sector in Nanded District , Maharashtra’ या विषयावर आपले शोध प्रबंध विद्यापीठास सादर केले होते.त्यांनी प्रा.आर.व्ही.तेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले. या यशा बद्दल प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे प्राचार्य डॉ अरुण जैन यांनी प्रा कांबळे सरांचे सत्कार केले. या प्रसंगी उप प्राचार्य प्रा पराग पाटील,प्रा.जे सी.अग्रवाल,डॉ विजय तुंटे,डॉ.मुकेश भोळे,डॉ.आर.सी सरवदे,डॉ माधव भूसनर,प्रा.जयेश साळवे उपस्थित होते,या सर्वांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिले.





















