जळगाव मिरर | २२ जून २०२३
रावेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉन विरोधात मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचा दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास व २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घराबाहेर व गावातील बाजारात सतत पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन (वय २७) याच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.