जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४
जळगावात जावयाकडे आलेल्या वृद्ध महिलेने गोधडी धुतल्यानंतर वाळात टाकण्याठी गेल्या. यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास शहरातील हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथील ६० ते ६५ वर्षीय वृद्ध महिला शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या जावयाकडे आलेली होती शनिवारी गोधडी धुतल्यानंतर ती जिन्याच्या लोखंडी कठड्यावर टाकण्यासाठी गेल्या. यावेळी वृद्धेला विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिन्यावर वीजप्रवाह कोठून आला याचा शोध घेण्यासाठी या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. तसेच घटनास्थळावर वीजप्रवाह कोठून आला याची पाहणी करण्यात आली. यासंदर्भात कुटुंबियांकडून माहिती देण्यात आली नाही. तसेच याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.