जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यासह तृणमुल काॅंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे. या तीनही पक्षांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे. 10 जानेवारी २००० ला राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत दर्जा कायम होता. परंतु त्यानंतर पक्षाला आयोगाने नोटिसा पाठवल्या. इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. इतर राज्यातला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली होती. २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या बाबींचा निवडणूक आयोगाने विचार करुन त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.