जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
साई मोरया मित्र मंडळ गणेशोत्सवाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झालेली असून अध्यक्षपदी दिप पाटील तर सचिव पदी धिरज महाजन यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत जाधव उपाध्यक्ष हितेश पाटील सचिव सिद्धांत कदम, कार्याध्यक्ष गणेश कुमावत यांच्या मुख्य उपस्थितीत बैठक झाली.
गणेशोत्सवासाठी सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन अध्यक्ष दिप पाटील उपाध्यक्ष केतन पाटिल व सोहन आमोदकर , सचिव धिरज महाजन, कार्याध्यक्ष – निखील पाटील, खजिनदार – धिरज पाटील, सरचिटणीस – आदित्य कुमावत, वैभव चंद्रात्रे, सहसचिव – कल्पेश ठाकरे, ज्ञानेश्वर पाटील, वेदांत ईशी, सदस्य – प्रतिक सोनवणे, देवेन ईशी, चेतन कोळी, देवेश सोनवणे, उमेश ठाकूर, मनिष ईशी, रुपेश पाटील, गणेश महाजन, हर्ष महाजन आदींची निवड केली आहे. तसेच यंदाच्या २१ व्या वर्षी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, अध्यात्मिक व पर्यावरणपुरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.