जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४
मध्यरात्रीच्या सुमारास महिलेच्या घरातील बेडरुममध्ये शिरुन तिला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत मारहाण केली. ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी एका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात ३४ वर्षीय महिला वास्तव्यास असून दि. २ नोव्हेंबर रोजी बेडरुममध्ये झोपलेली होती. यावेळी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एक व्यक्ती जबरदस्ती त्या महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेला झोपेतून उठवून तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, महिलेने दुसऱ्या दिवशी तालुका पोलिसात तक्रार दिली.