
जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२४
चोपडा तालुक्यातील अडावद येथील तरुणांनी दि.७जानेवारी रविवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व तसेच मनसे नेते मनविसे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अडावद गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी पक्ष प्रवेश केला. त्याच बरोबर डिंगबर महाजन,मयूर माळी,मनोज माळी,वैभव पाटील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स तर रोहित चौधरी यांचे अग्निशामक दलात भरती झालेल्या तरुणाचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील,गौरव सोनवणे, चेतन पवार पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. जयेश भोई, सिंधू अहिरे, दिपक पाटील, हर्षल महाजन, अजय कोळी,राजेश महाजन,मयूर महाजन, भावेश पवार, यश ठाकूर, अनिकेत शिंपी, राजेश कोळी, भावेढा पाटील, मयूर कोळी,विनोद राणे,डिगबर महाजन,उमेश कुंभार,विक्की कुंभार,मनोज माळी,अभय पाटील,किरण महाजन,मयूर जितेंद्र पाटील,सुमित राणे,यश पाटील,प्रवीण महाजन,भूषण महाजन हर्षल मोरे,भटू चौधरी ल, पवन साळुंखे, नितीन पाटील क्रिष्णा कोळी, तेजस कोळी, पियुष पाटील आदींनी प्रवेश केला आहे. दरम्यान पक्ष अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असून पक्षाचे ध्येय धोरणे तळागळात राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले..