मेष : आज तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. ज्ञानवर्धक आणि मनोरंजक कार्यात वेळ जाईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. अचानक काही अडचण आल्या तरी समजूतदारपणाने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. बेकायदेशीर कृत्यात सहभागी असणार्यांपासून लांब राहा.
वृषभ : जमीन-मालमत्ता आणि गुंतवणूक अशा कामांमध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. सर्व काही ठीक असले तरी मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतित केल्यास तणाव कमी होईल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक कामे वाढतील.
मिथुन : आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. व्यक्तिमत्व संवर्धनाकडे विशेष लक्ष द्याल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर फायदेशीर योजना बनतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवर जास्त खर्च झाल्याने तुमचे बजेट बिघडू शकते. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे.
कर्क : आज तुम्ही उत्सवात व्यस्त राहू शकता. कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकाराला थारा देवू नका. अन्यथा केलेले काम खराब होऊ शकते. खूप घाई आणि उत्साह एखाद्याशी संबंध खराब करू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते.
सिंह : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळजी चिंता दूर झाल्याने मनःशांती लाभेल. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होतील. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ व्यतित करा.
कन्या : आज वेळ अनुकूल आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अगदी योग्य ठरेल. विद्यार्थी विचारात जास्त वेळ घालवू शकतात. त्यामुळे कोणतेही यश हातातून निसटू शकते. महिलांना यश मिळेल.
तूळ : आज कर्मावर विश्वास ठेवल्याने तुमच्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती निर्माण होईल. घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. यावेळी तुमचे काहीतरी समोर येऊ शकते. परिस्थिती संयमाने हाताळा.
वृश्चिक : आज मागील काही काळापासून सुरु असलेले अडथळे दूर करण्यात यश मिळेल. तुम्हालाही आत्मसमाधानाची भावना असेल. राजकीय, सामाजिक चळवळीत विशेष योगदान राहील. तरुणांची करिअरबाबतची बेपर्वाई भविष्यासाठी घातक ठरू शकते. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल.
वृश्चिक : आज मागील काही काळापासून सुरु असलेले अडथळे दूर करण्यात यश मिळेल. तुम्हालाही आत्मसमाधानाची भावना असेल. राजकीय, सामाजिक चळवळीत विशेष योगदान राहील. तरुणांची करिअरबाबतची बेपर्वाई भविष्यासाठी घातक ठरू शकते. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल.
मकर : तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवून तुमची विशेष प्रतिभा जागृत करण्यात वेळ जाईल. विशेषत: विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. आत्मकेंद्री वृत्तीमुळे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.
कुंभ : वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील. गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात.अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. यंत्र किंवा तेलाशी संबंधित व्यवसायात अनुकूल गोष्टी घडतील. अतिकामामुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही.
मीन : तुम्ही आज बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतो. तुमचा स्वभाव शांत आणि संतुलित ठेवा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.