जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या येत आहे, तत्पूर्वी राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस आज दि.२२ नोव्हेबर रोजी जळगाव शहरात विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा होत आहे. त्यामुळे शहरातील ७ शिवाजी नगर या निवासस्थानी सामाजिक, राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठी रीघ लागली आहे.
जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन व माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या माध्यमातून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा वाढदिवस मोठय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भला मोठा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील राजकीय नेत्यांची मोठी रीघ लागली होती.