जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याला हादरला बसेल अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने धक्कादायक निर्णय घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील एका परिसरातील प्रेमी युगलाने किरकोळ वादातून दोघांनी जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दि.३ रोजी घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथील कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २०) या तरूणीवर प्रेम असून या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते. शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. दरम्यान, काजलच्या निधनाची वार्ता येताच कुणाल मनोज भालेराव याने थेट तापी नदीचा पुल गाठून तेथून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.