• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्र्यांनी केला दृष्टीदानाचा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी

जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६

गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचत आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्य संपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री श्री पाटील यावेळी म्हणाले,आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणी नंतर आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचारासाठी पाठवले जाणार असून, ही ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘मायेची दृष्टी’ ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पाळधी व परिसरात जी विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे या परिसराचा काया पालट झाला आहे या कामांमुळे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपने आतापर्यंत
३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे,
२९,२६० रुग्णांची तपासणी,
१०,९४० मोतिबिंदू शस्त्रक्रिया
यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी “पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खरे अर्थाने ‘दृष्टीदाता’ आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.

परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण

पाळधी खुर्द,पोखरी, पोखरी तांडा, पाळधी बु.
पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्या बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, ठीक ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल, एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि.प. सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले, जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जनतेच्या विश्वासामुळेच हे सेवायज्ञ अखंड सुरू आहे. जीपीएस ग्रुपचे सदस्य प्रशांत झंवर यांनी सूत्रसंचालन केले. आभार जीपीएस स्कूल कॅम्पचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उपसरपंच निसार शेख,
लोकप्रतिनिधी,जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group