जळगाव मिरर | २२ जुलै २०२३
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका गावात वनविभागात सीसीएफ असल्याची बतावणी करीत जामदा येथे शाळेत मुलांना वह्या वाटपासाठी आलेल्या तोतया वन अधिकाऱ्याला गजाआड केले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथील माध्यमिक विद्यालयात मुलांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमास वन अधिकारी आलेले आहेत. त्यावरून नगराळे यांना शंका आल्याने त्यांनी ही बाब मेहूणबारे पोलिसांच्या कानावर घातली व या ठिकाणी वन विभागाच्या कार्यालयातील सी.व्ही. पाटील ( वनपाल जुवार्डी), जी.एस. पिंजारी ( वनपाल घोडेगाव), राहुल पाटील (वनरक्षक शिवरे). एम.पी. शिंदे (वनरक्षक पश्चिम जुवाडी) यांनी घटनास्थळ गाठले. त्याचवेळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. याबाबत अधिक चौकशी केली असता हा तोतया वनअधिकारी नितीन रविंद्र पगारे रा. बहाळ ता. चाळीसगाव येथील असल्याचे निषन्न झाले आहे. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.