जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४
शहरातील गणेश कॉलनीमीधल एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट (सीडीएम) मशिनमध्ये शंभर रुपयांच्या १४ बनावट नोटा जमा केल्या. ही घटना दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात बनावटी करणेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजानन कॉलनीत संदीप सुदाम चौधरी हे वास्तवयास असून ते गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या बँकेशेजारी असलेल्या एटीएम व सीडीएम मशीन असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये संशयित निशिकांत कैलास पाटील याने शंभर रुपये दराच्या १४ बनावट नोटा जमा केल्या होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर दि. १३ डिसेंबर रोजी मॅनेजर संदीप चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित निशिकांत कैलास पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक उल्हास चहाटे हे करीत आहे