जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
शहरातील एका मित्र मंडळाने आपल्या मंडळाच्या नावाने काही व्यक्ती पावती पुस्तक बनवून अनेक ठिकाणाहून पैसे उकळत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार आजी-माजी नगरसेवक यांना विनंती करण्यात येते की आमच्या हरिओम नगर मित्र मंडळ जुना कानळदा रोड व हरिओम नगर व बहुउद्देशीय संस्था या नावाने काही गणपती व देवी मंडळाकडून बनावट पावत्या छापून त्या नावाखाली वर्गणी जमा करण्यात येत आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्याही पावत्या आल्या त्या सर्व पावत्यांची शहानिशा व रजिस्टर नोंदणी तपासून तपासून व हरिओम नगर संस्थेचे संपर्क करून तरच वर्गणी देण्यात यावी. तसेच हरिओम नगर मित्र मंडळ च्या नावाखाली मंडळाचे नाव बदल होऊ शकते किंवा पत्ता बदल होऊ शकतो असे काही प्रकार घडू शकतात. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की अशा प्रकारची कोणतीही वर्गणी देण्यात येऊ नये अशी सदर पावती आढळल्यास अशा बनावट पावती आढळल्यास सरळ पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात यावी ही विनंती. सदर हरी ओम नगर हे जुना कानळदा रोड येथे गेले 25 वर्षापासून गणपती बसवत असून आजपर्यंत आमच्या मंडळ गेल्या मागील दोनच्या वर्षापासून आमच्या मंडळाच्या नावाखाली काही टवाळखोर मुलांकडून मंडळाच्या नावाखाली खोट्या पावत्या छापून असे वर्गणीचे पैसे जमा करण्यात येत आहे.
यांनी केले आवाहन !
अध्यक्ष योगेश खर्चाने, उपाध्यक्ष योगेश साळी, ज्ञानेश्वर तुळसकर, रुपेश तुळसकर, अनमोल पाटील, दीक्षांत सोनवणे, आयुष सोनवणे, प्रेम केदार, रोहित शर्मा, प्रितेश निंबाळकर, विष्णू सोनवणे, देवदास निंबाळकर, जीवन सोनवणे यांनी आवाहन केले आहे.
