जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२४
बंद घर फोडून ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी शहरातील जुना खेडी रोडवरील गिताई नगर येथ सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुना खेडी रोड परिसरातील गिताईनगर येथील रहिवासी सुपडू गुलाब सोनवणे वय ४० हे तरूण कोल्ड्रिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. चोपडा येथील नातेवाईकांकडे लग्न असल्याने शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सुपडू सोनवणे यांनी घर बंद करून गावाला निघून गेले होते. यावेळी घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार परेश जाधव हे करीत आहे.